*पाचोरा पोलीस स्टेशनचे संदिप राजपुत व समिर पाटील यांचे सर्वत्र कौतुक*


(पाचोरा)

पाचोरा तालुक्यातील एका गावात ३० वर्षाच्या मतिमंद युवकावर वृद्धाने शेतात अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार पाचोरा तालुक्यातील घडला.संशयित ६७ वर्षांचा आरोपी या घटनेनंतर फरार झाला होता.

६७ वर्षाच्या वृद्धाने गावातील एका मतिमंद युवकाला गावाजवळील शेतात नेले.तेथे त्याच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना शेतात मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी गेलेल्या काही युवकांनी पाहिली. त्यांनी त्या वृद्धाला पकडले मात्र तो पसार झाला होता.

ही घटना समोर आल्यानंतर पीडीत मतिमंद युवकाच्या वडिलांनी पाचोरा पोलीस ठाणे गाठून आपल्या मुला सोबत झालेल्या अतिप्रसंग कथन केला. यावेळी पोलीस स्टेशन येथे अपंग व्यक्ती अ.अधि २०१६ क.९२ ब.बि.एन. एस ११५.१३३.३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा संवेदनशील असल्याने वरिष्ठांच्या सुचनेनुसार तात्काळ पोलिस काॅ.संदिप राजपुत व समीर पाटील यांनी आरोपीला जेरबंद करण्यासाठी आपल्या खबऱ्यांना आदेश देत आरोपीला चोवीस तासांत आत मोठ्या शिताफीने नजरकैदेत केले.यामुळे पो काॅ संदिप राजपुत,समिर पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.पाचोरा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अशोक पवार सह सहकाऱ्यांनी पो काॅ संदिप राजपुत,समिर पाटील यांचा या कामगिरीमुळे अभिनंदन हि केले.