अबरार मिर्झा भडगाव :-
राही मल्टीपर्पज फाउंडेशन या संस्थेने रमजानच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मातील गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तूंच्या १०० कीटचे वाटप केले.
राही मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे कीटचे वाटप
रमजानच्या पार्श्वभूमीवर जपली सामाजिक बांधिलकी
भडगाव तालुक्यात ः राही मल्टीपर्पज फाउंडेशने रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मातील गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तूंच्या १०० कीटचे वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे
राही मल्टीपर्पज फाउंडेशन गेली ०१ वर्षे सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे तसेच रमजानसारख्या पवित्र महिन्यात गोरगरिबांना अन्नधान्याचे कीट म्हणजेच रमजान कीट सातत्याने वाटप करत आहेत. यावर्षी संस्थेने आत्तापर्यंत १०० कीटचे वाटप केले. भडगाव तालुक्यातील गरजू लोकांना ही कीट वाटली. रमजान कीटमध्ये २ किलो तांदूळ तसेच गहू , प्रत्येकी ३ किलो डाळी व इतर कडधान्य,२ किलो साखर, बेसन, चहापावडर, हळद,मीठ, मसाला, आंघोळीचा साबण खोबर तेल तसेच काही ठिकाणी ड्रेस आदी वस्तूंचा या कीटमध्ये समावेश आहे. प्रत्येक कीट आहे
संस्थेचे अध्यक्ष दानिश आलम, उपाध्यक्ष अबरार मिर्झा, सचिव मुज्जमील शेख,खजिनदार जमाल कासार,सदस्य जुबेर बेग, सदस्य जुनेद मन्यार,सिद्दीक शेख परिश्रम घेत आहे

0 Comments