भडगाव प्रतिनिधी चेतन महाजन.
३ मार्च २०२५: पिंपळगाव बांबरून नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते. मात्र, काही वेळातच ते ट्रॅक्टर कोणाच्या तरी मध्यस्थीने किंवा आशीर्वादाने पळवले गेले. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, तसेच कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तहसीलदार यावर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध गौण खनिजला लगाम घालण्यासाठी प्रशासन काय पाऊले उचलणार, याबद्दल नागरिकांच्या मनात शंका आहेत. या प्रकरणी अधिक माहिती लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे.

0 Comments