पाचोरा येथील

*दि 9 एप्रील 2025* *बुधवार रोजी  जयकिरण* *प्रभाजी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा येथे सामूहिक* *विश्वशांतीसाठी सामूहीक नवकार महामंत्र प्रार्थना

108 वेळा घेण्यात आली. हा नवकार विश्वशांती मंत्र 108 देशात एकाच वेळेस लाईव्ह टेलीकास्टच्या माध्यमातून विश्वात शांती एकता निर्माण व्हावी त्यासाठी हा नवकार महामंत्र मा.पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला . हा नवकार महामंत्र का पठण केला जातो? त्याचे महत्व काय? हे मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या भाषणातून विस्तृतपणे सांगितले जर रजीस्ट्रेशन द्वारे संख्या वाढली तर 9 एप्रिल हा दिवस नवकार दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. यावेळी मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी भारतवासियांना 9 संकल्प करण्यास सांगितले 1ला संकल्प पाणी वाचवा, 2 रा संकल्प एक झाड आईच्या नावाने लावा, 3 रा संकल्प स्वच्छता, 4 था संकल्प वोकल फॉर लोकल, 5 वा संकल्प देवदर्शन, 6 वा संकल्प नॅचरल फार्मिंग चा स्वीकार करणे, 7 वा संकल्प हेल्दी लाइफस्टाईल, 8 वा संकल्प योगा आणि खेळ हे जीवनात आणणे आणि 9 वा संकल्प गरिबांची मदत करणे हे 9 संकल्प भारत वासियांना करण्यास सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष श्री.गिरीषजी कुलकर्णी, सचिव श्री.जीवनजी जैन, सहसचिव श्री. संजयजी बडोला, खजिनदार श्री.जगदीशजी खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन श्री.लालचंदजी केसवाणी, स्कूल कमिटी सचिव श्री. रितेशजी ललवाणी, संचालक श्री संजयजी चोरडीया,श्री.गुलाबजी राठोड श्री.प्रभुलालजी शर्मा, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष राजेश जैन, महिला अध्यक्षा हर्षा संघवी.गोपालजी पटवारी,सौ.प्रितीजी जैन. श्री.महेंद्रकुमारजी हिरण, श्री.अशोककुमारजी मोर, श्री.शेखरकुमारजी धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे,रुपाली जाधव,प्रिती शर्मा,शितल तिवारी,दिपिका रणदिवे,योगिता शेंडे,पुजा पाटील,ज्योती बडगुजर,कविता जोशी,रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राम्हणकर,विद्या थेपडे,,शितल महाजन,स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे,वाल्मिक शिंदे,किरण बोरसे,संगिता पाटकरी, पुजा अहिरे,पुनम कुमावत, शालिनी महाजन,कल्पना बोरसे,निवृत्ती तांदळे, संजय सोनजे, संदिप परदेशी,कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर,शिवाजी ब्राम्हणे,अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी,मनिषा पाटील,शिवाजी पाटील,विकास मोरे  सर्वांच्या उपस्थित नवकार महामंत्त्राचा कार्यक्रम  शाळेच्या प्रांगणात पार पडला.