चोरांचा सरदार पीएसआय माटे चोरांसह पोलिस कोठडीत



सज्जनांचे रक्षण करण्याऐवजी चोराना चोरी करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा सरदार बनलेल्या पीएसआय प्रल्हाद पिरोजी माटे याच्यासह त्याच्या तिघा साथीदारांना पोलिस कोठडीत जाण्याची वेळ आली आहे.

 अट्टल खिसे कापूंसोबत एखाद्या पोलिस उपनिरीक्षकाचा सक्रिय सहभाग असावा, यावर लवकर विश्वास बसत नाही. मात्र अशीच घटना स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा पोलिसांनी उघडकीस आणून पोलिस उप निरीक्षकासह तीन चोरांना चोरी करून पळताना अटक केली आहे.


जालना येथील बाजार पोलिस स्थानकातील पोलिस उपनिरीक्षक व आरोपी प्रल्हाद पिराजी मांटे (५८, जालना) हा अधिकारी काही वर्षांपासून बसस्थानकावर चोरी करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला. यातील आरोपी हे चोऱ्या करायचे. यातून दहा टक्के हा अधिकारी घ्यायचा.

विशेष म्हणजे पोलिस उप निरीक्षक स्वतः चोरीच्या घटनेत सहभागी व्हायचा. अंबादास सुखदेव साळेकार (४०, बुलढाणा), रईफ शेख अहमद (४५, म्हाळस, जावळा, जि. बीड), श्रीकांत भीमराव बघे (२७, खामगाव) यांनी याआधीही चोऱ्या केल्या आहेत. १६ रोजी दुपारी या टोळीने वाळकी येथील वृध्द इसमाच्या खिशातून ३५ हजार रूपये काढून चोरी केली. त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.