*पिंपळगाव पोलीसांची अभिनव कामगिरी चोरिस गेलेले सोने पकडले काही तासातच*
दिनांक ०७/०४/२०२५ रोजी पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंप्री सार्वे ता. पाचोरा येथील आनंदराव विठ्ठल पाटील यांचे घराचे पत्री खोलीतुन सुमारे ०६ तोळे सोने अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याबाबत पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन भाग ५ गु.र.नं. ८३/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता व सदर गुन्ह्याचे तपासात, मा. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव भाग कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे, अमोल पाटील, नामदेव इंगळे, ईमरान पठाण यांचे पथक तयार करुन सदरचा गुन्हा ऊघडकिस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सदर गुन्ह्यात राजेंद्र किसन पाटील वय ४२ वर्ष रा. सार्वे पिंप्री ता. पाचोरा यास सदर गुन्ह्यांत तपासकामी ताब्यात घेवुन विचारपुस करुन त्याने सदर गुन्ह्यातील गेलेला माल १) ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे २) १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नॅकलेस तसेच ३) ०२ चांदीचे पायातील पैंजण असा सुमारे ४,८२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हा गुन्ह्याचे तपाससकामी जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीतास गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे करित आहे.

0 Comments