भडगाव येथे राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वी; 30 प्रकरणांमध्ये 19 लाखांहून अधिक रकमेची तडजोड

भडगाव: विधी सेवा समिती भडगाव आणि


तालुका वकील संघ भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज, दिनांक 10 मे 2025 रोजी भडगाव न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयाला पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिला.


या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये प्रलंबित आणि वादपूर्व अशा एकूण 30 प्रकरणांची यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण 19 लाख 32 हजार 381 रुपयांची तडजोड झाली, ज्यामुळे पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.


सदर लोकन्यायालयामध्ये भडगाव न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती पी. व्ही. राजळे यांनी प्रमुख म्हणून कामकाज पाहिले. पॅनल एडवोकेट म्हणून श्री. बी. आर. ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


या लोकन्यायालयाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी भडगाव वकील संघाचे अध्यक्ष श्री. बी. आर. पाटील, उपाध्यक्ष श्री. बी. टी. अहिरे आणि भडगाव वकील संघाच्या सर्व सदस्यांनी तसेच विधी सेवा समिती भडगाव येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आणि सक्रिय सहकार्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे लोकन्यायालय यशस्वी झाले, असे गौरवोद्गार काढण्यात आले.