मामानेच केला भाचीवर अत्याचार
अमळनेर-
आई - वडील ऊस तोडायला गेल्याने
आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे.
एका विवाहित महिलेचा पती दुसऱ्या महिलेबरोबर पळून गेल्याने तिचा खावटीबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. म्हणून ही महिला येथे आई
वडिलांकडे राहात होती.महिलेचे आई -वडील दसऱ्यानंतर ऊस तोडायला अहिल्यानगर येथे गेले होते. मुलीचा न्यायालयात खटला सुरू होता म्हणून ते आपल्या मुलीला तिच्या चुलत मामाकडे राहण्यास ठेवून गेले होते.
चुलत मामाने आपल्या भाचीला आणि तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत अत्याचार केला. याबाबत पीडित महिलेने दि. २९ एप्रिल रोजी अमळनेर पोलिसात फिर्याद दिली आहे.

0 Comments