*जळगाव पोलिसांची महानिरीक्षकांकडून कानउघडणी*
(जळगाव)
गेल्या काही दिवसांपासून खंडणी व ड्रग्स
प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या जळगाव जिल्हा पोलीस दलाची नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांनी केली आहे बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कठोर शब्दात सुनावले ज्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे त्यांच्यावर कडक कारवाई होणारच कोणालाही पाठीशी घालणार नाही असा स्पष्ट इशारा कराळे यांनी दिला.
विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांचे बैठक घेतली. या बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर यांच्यासह सर्व विभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
*ड्रग्ज प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणारच*
ज्या अधिकारी- कर्मचारी विरुद्ध आरोप झाले आहेत आणि ज्यांच्यावर पोलीस अधीक्षकांकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीनंतर कोणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई केली जाईल. असे कराळे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ड्रग्स प्रकरणात देखील चौकशीनंतर संबंधित दोशीवर कार्य होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

0 Comments