*'चिमणा' दोनदा बोहल्यावर चढला; तीन महिन्यांत दोन्ही चिमण्या भुर्रर्र*
कडा.(जि.बीड): पावणेसहा लाख देऊन दोनदा बोहल्यावर चढलेल्या नवरदेवाच्या नशिबी दोन्ही बायका तीन महिन्यांत भुर्रर्र झाल्या. याप्रकरणी वरबापाच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा फसवणुकीचा प्रकार आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दी घडला.
आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील एका व्यक्तीने मुलाचे लग्नाचे वय वाढत असल्याने व लग्न जुळत नसल्याने तालुक्यातील दोघांच्या व वाघोली येथील एका महिलेच्या मध्यस्थीने मुलीचे स्थळ शोधले १६ मार्च २०२५ रोजी लग्न लावून दिले. पण काही दिवसात नवरीने धुम ठोकली. नवरदेवाकडील लोकांनी मध्यस्थीवर ठपका ठेवल्याने व आर्थिक व्यवहार झाल्याने त्यांनी पुन्हा ११ मे २०२५ रोजी दुसरे लग्न लावून दिले पण दुसऱ्या नवरीने ही काही दिवसात धुम ठोकली.
*मध्यस्थीकडून फिर्यादीस मारहाण*
मध्यस्थी असलेले कापशी येथील लक्ष्मण जगताप, विष्णू कुराडे या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
*आठवड्यातलले दुसरी 'मॅरेज फ्रॉड'*
१) सध्या लग्नाळू तरुणामुळे मिळत नसल्याने ही संधी साधत बनावट लग्न लावून देणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. तीन दिवसापूर्वी वडवणी तालुक्यातील एका ऊसतोड मजूर तरुणाला लग्नाच्या जाळ्यात अडकवून फसवण्याचा प्रकार ताजा असतानाच अंभोरा ठाणे हद्दीत दुसरी घटना उजेडात आली आहे.
२) पाच लाख 70 हजार रुपये देऊन एकही नवरी मुलाजवळ राहिली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात नवरदेवाच्या वडिलांनी अंभोरा पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली.
३) त्यानुसार लक्ष्मण साहेबराव जगताप, विष्णू म्हसू कुऱ्हाडे (दोघं रा.कापसी), ज्योती पाटील (रा. वाघोली जिल्हा पुणे) निकिता व अश्विनी (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध अंभोरा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

0 Comments