*पाचोरा पीपल्स बँक १५ जागांसाठी ४८ अर्ज वैध, बँक कोणाच्या ताब्यात जाईल?*


येथील दि पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव बॅकेच्या


सार्वत्रिक निवडणुकी कार्यक्रम जाहीर झाला असून १५ जागांसाठी ४८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.तीन जणांचे अर्ज नामंजूर करण्यात आले.

१३ जुलै रोजी मतदान होत आहे १५ जुन रोजी अर्ज दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी एकुण ५१ उमेदवारांनी ६० अर्ज दाखल केले.आज अर्जाची छाननी केली असता तीन उमेदवारांचे अर्ज बाद केले.यात अस्मिता नित्यानंद पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.१५ जागांसाठी ४८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले आहेत.दि ३० जुन रोजी माघारीची तारीख आहे १३ जुलै रोजी मतदान होणार आहे.१४ जुलैला मतमोजणी होऊन पीपल्स बँकेचा ताबा कोण मिळवतो हे घोषित होणार आहे.अशी माहिती निवडणूक सहायक अधिकारी आर.आर.पाटील यांनी दिली.