पाचोरापाचोरा तालुक्यात शेतकरी अनुदान घोटाळा.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा तालुक्यात सन २०२२, २०२३ व २०२४ या कालावधीत झालेली अतिवृष्टी, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेले अनुदान परस्पर लाटून खाल्ले असल्याचे वृत्त स्वराज्य न्यूजकडे प्राप्त झाले असून हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशावर मारलेला डल्लाच आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जीवदान देण्यासाठी झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून त्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा केले होते. परंतु पाचोरा तहसील कार्यालयातील काही कर्मचारी, काही गावातील तलाठी व कोतवाल यांनी संगनमताने एका सक्षम अधिकाऱ्यांच्या मेल आयडींचा गैरवापर करुन संगणकीय फेरफार आणि बनावट कागदपत्रांची निर्मिती करुन शासनाची व अनुदान दिलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता हा झालेला प्रकार संबंधित जबाबदार काही कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर मागील आठ दिवसांपासून याबाबत खलबते सुरु झाल्यापासून या घोटाळ्यात सामील असलेला तहसील कार्यालयातील कर्मचारी, तलाठी व कोतवाल यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी आता मेल आयडी व कागदपत्रांची केलेली हेराफेरी कशी झाकता येईल याकरिता पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असून ज्या, ज्या शेतकऱ्यांच्या नावावर आलेल्या अनुदानाची हेराफेरी केली आहे अशा शेतकऱ्यांना भेटून गयावया करत तुमचे पैसे आम्ही आणून देतो अशी आश्वासने दिली जात आहेत.
परंतु हे आलेले शासकीय अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणे गरजेचे आहे व होते परंतु असे न करता हेराफेरी करुन शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
वरील बाबतीत तथ्य आढळून आले असून जामनेर तालुक्यातील मालखेडा येथील शेतकरी रतीलाल गबरु नाईक याची अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या जोगे वडगाव शिवारात शेतजमिनी असून या शेतजमिनीवर शासनामार्फत आललेले शासकीय अनुदान न मिळाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे संबंधित तलाठी कार्यालयात जाऊन तपास केला असता त्याला उडवाउडवीची उत्तरे देऊन संबंधित तलाठी यांनी चालढकल केली म्हणून संबंधित शेतकऱ्याच्या मुलाने शासकीय ई सुविधा केंद्रावर जाऊन अधिक माहिती काढली असता यामध्ये संबंधित शेतकऱ्याच्या नावे शासनाकडून आलेल्या अनुदानाची रक्कम दिसून येत आहे.
परंतु सदरच्या अनुदान रकमेबाबत अधिक चौकशी केली असता ही रक्कम पिंप्री खुर्द तालुका पाचोरा यांच्या ई सेवा केंद्रातून परस्पर ई के. वाय. सी. करुन रतिलाल गबरु नाईक यांच्या नावे व्हि. के. नंबर २४२५ आर. एन. आर. एच. आर. ३९७३ व्ही. ए. डी. १६२८०८८ वरुन ज्या इसमाचा या शेतजमिनी किंवा शेत मालकाशी काडीचाही संबंध नसलेल्या विश्वनाथ कडूबा पाटील यांच्या नावे पाचोरा स्टेट बँक शाखेतील खाते नंबर ३४२४१०८१७५५ या खात्यावर रुपये रक्कम ३४१३६/०० रूपये परस्पर हस्तांतरित करुन काढून घेतल्याची बाब उघडकीस आली असून या विश्वनाथ कडूबा पाटील याचा कोणताही संबंध नसतांनाही भ्रमणध्वनी क्रमांक ८०८७१७८४१३ हा लिंक केल्याचे आढळून आले आहे.
असाच प्रकार तक्रारदार शेतकरी रतिलाल गबरु नाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील संगीता राजाराम चव्हाण व पाचोरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे अनुदान परस्पर हडप केल्याचे वृत्त असून काही शेतकऱ्यांनी पिंप्री खुर्द येथील माऊली ऑनलाईन सर्व्हिसेसचे संचालक दिपक नाना पाटील यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता आम्ही सर्व लोकांना हप्ते देतो आमचे कुणीही काहीही करु शकणार नाही आम्ही तहसीलदार, तलाठी हे ही यांच्यासोबत या घोटाळ्यात सामील आहे असे निर्लज्ज पणाचे उत्तर शेतकऱ्याला दिले आहे.
या हेराफेरीच्या प्रकरणात विश्वनाथ कडूबा पाटील, भ्रमणध्वनी क्रमांक ८०८७१७८४१३, किशोर परदेशी भ्रमणध्वनी क्रमांक ८०८०९१९५४२ तसेच रुपेश परशुराम पाटील भ्रमणध्वनी क्रमांक ९७६४३४५५०५ या खातेदारांशी संपर्क साधला व आमच्या नावाने आलेली नुकसानीची रक्कम तुमच्या खात्यात कशी आली याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की आमची ई के. वाय. सी. करायची परस्पर लाईन असून आम्हाला बोटांचे ठसे न घेताही ई के. वाय. सी. करण्याची व्यवस्था असल्याने आम्ही कुणाच्याही खात्यातील पैसे काढून घेऊ शकतो व या हेराफेरीत सामील असलेल्या महसूल विभागातील जबाबदार असलेल्या लोकांना आम्ही अर्धे पैसे काढून दिले आहेत यामुळे आमचे कुणीही काहीही करु शकत नाही अशी दादागिरीची भाषा वापरली असल्याचे तक्रारदारांनी मा. तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत लेखी स्वरुपात म्हटले आहे.
म्हणून या सर्व गैरप्रकारांची सखोल चौकशी करुन शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेल्या अनुदानाच्या रकमेची तसेच या अनुदानाची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या तलाठी, कोतवाल, ई के. वाय. सी. संचालक व ऑनलाईन सुविधा केंद्राचे संचालक व या कटात सामील असलेले बोगस लाभधारक शेतकरी व इतर लोकांच्या बॅंक खात्यांची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार शेतकरी रतिलाल गबरु नाईक मालखेडा तालुका जामनेर यांनी केली आहे.
याबाबत संपूर्ण तालुक्यात अनुदान घोटाळ्यात लाखो रुपयांची हेराफेरी झाली असून या प्रकरणी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी दखल घेतली असून मा. जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व या घोटाळ्याची माहिती दिली असता संबंधित जिल्हाधिकारी यांनी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त आहे. तालुक्यात शेतकरी अनुदान घोटाळा.!!!

याबाबत संपूर्ण तालुक्यात अनुदान घोटाळ्यात लाखो रुपयांची हेराफेरी झाली असून या प्रकरणी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी दखल घेतली असून मा. जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व या घोटाळ्याची माहिती दिली असता संबंधित जिल्हाधिकारी यांनी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त आहे.

0 Comments