नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर वारंवार अनुपस्थित =शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा पाटील वारंवार अनुपस्थित राहत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. प्रतिनिधीने तीन वेळा प्रत्यक्ष भेट दिली असता त्या एकदाही केंद्रावर हजर नव्हत्या. विशेष म्हणजे त्यांनी रजेचा अर्ज सुद्धा सादर केलेला नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून समजले.
आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तातडीच्या सेवांचे प्रमुख ठिकाण आहे. मात्र, डॉक्टर अनुपस्थित राहिल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. गर्भवती महिला, लहान मुले तसेच वृद्ध रुग्ण यांना खास करून याचा मोठा फटका बसतो आहे.
पाचोरा शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे यांचे म्हणणे आहे की, "डॉक्टर अधिकाऱ्यांचे आदेश सुद्धा जुमानत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होत असून आरोग्य सेवेवर थेट परिणाम होत आहे."
दरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरू लागली आहे. अन्यथा नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देत आहेत.

0 Comments