*पाचोरा येथील ‘घोडके, परिवार जोपासत आहे १९४५ परंपरा*



 पाचोरा प्रतिनिधी :-


येथील ‘घोडके आर्टस्’ ची सुरुवात १९४५ साली माझ्या आजोबांनी केली. त्या काळात ते स्वतःच्या हाताने मातीचे गणपती तयार करून ही कलापरंपरा रुजवली. त्यानंतर वडील आणि काकांनी यात रस घेतला आणि ही परंपरा अधिक जोपासली.


आज आम्ही या कलेच्या चौथ्या पिढीत प्रवेश केला आहे. माझं नाव राजू घोडके (शंकर गणपत घोडके) आहे. आजोबांनंतर वडील, काका, मग आमचे मोठे भाऊ आणि मी — अशा पिढ्यानपिढ्या ही कला आम्ही जिवंत ठेवली आहे.


ही केवळ व्यवसायाची गोष्ट नाही, तर आमच्या कुटुंबाची श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी आहे. आमच्याकडे अशी परंपरा आहे की दरवर्षी कुटुंब एकत्र येऊन मंदिरामध्ये ब्राह्मणांना विनामूल्य मूर्ती देऊन पूजेसाठी मांडणी करतो. ही सेवा आजही आम्ही मनापासून सुरू ठेवली आहे.

घोडके यांच्या आकर्षक मूर्ती फक्त पाचोर्‍या साठी मर्यादित नसून संपूर्ण राज्यात दिल्या जातात असे मुर्तीकार राजुभाऊ घोडके यांनी यावेळी सांगितले.