कासोदा पोलीसांकडून जुगार अड्ड्यावर छापा – ७ जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई

कासोदा (ता. एरंडोल) येथील पोलीस स्टेशन हद्दीतील कासोदा गावाजवळील शिवारात गालापुर रोडवर फैय्याज शेख यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकला. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दिनांक ११/०९/२०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पोलीस पथकाने छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगारासाठी वापरलेली रोकड रक्कम ३२,८००/- रुपये, मोबाईल व मोटारसायकल मिळून एकूण १,६६,३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत ताब्यात घेतलेले जुगारी:

शेख फारुख शेख नबी (वय ५०)

शेख शबीर शेख रफिक (वय ५०)

शेख निजाम शेख सिराज (वय ५२)

तस्लीम सुलतान खान (वय ४५)

शेख हमीद शेख शोकत (वय ३५)

शेख हमीद शेख अमीर (वय ४०)

शेख मुस्ताक खान अमीर खान (वय ६०) 

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र रेघे यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कविता नेरकर-कालसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. छाप्यातील पथकात निलेश राजपूत (सहाय्यक पोलीस निरीक्षक), अकील मुजावर, समाधान तांडे, प्रशांत पाटील, कुणाल देवरे व योगेश पाटील यांचा सहभाग होता.

कासोदा पोलीसांकडून वेळीच कारवाई करून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे.