पाचोरा येथे १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक न्यायालय.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तथा उच्च न्यायालय, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशानुसार पाचोरा येथे तालुका विधी सेवा समितीमार्फत राष्ट्रीय लोक न्यायालय दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी पाचोरा न्यायालयात आयोजित करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सभांमध्ये तालुका विधी सेवा समिती पाचोराचे अध्यक्ष तथा न्यायिक अधिकारी दिवाणी न्यायाधीश श्री. एस. व्ही. निमसे, सह-दिवाणी न्यायाधीश सौ. जी. एस. बोरा तसेच सन्मानीय जेष्ठ वकील बांधव उपस्थित होते.
सदर राष्ट्रीय लोकन्यायालयात खालील प्रकारची प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत :
नियमीत दिवाणी दावे व दरखास्ती
संक्षिप्त फौजदारी खटले
धनादेश अनादर प्रकरणे
वैवाहिक व कौटुंबिक वाद
न्यायालयात प्रलंबित इतर खटले
कायद्याने तडजोड करता येऊ शकणारी दिवाणी व फौजदारी प्रकरणे
याशिवाय राष्ट्रीयकृत बँका, मोबाईल व दूरध्वनी कंपन्या, वीज कार्यालय तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी/पाणीपट्टीसंबंधी वादपूर्व प्रकरणांमध्ये थकीत रकमेमध्ये सवलत देण्याचा प्रस्ताव आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाचोरा तालुका परिसरातील नागरिकांना आवाहन केले की,
“दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या लोकन्यायालयात आपली प्रलंबित किंवा वादपूर्व प्रकरणे ठेवून तडजोडीच्या माध्यमातून निकाल मिळवावा आणि या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.”

0 Comments