हाजी अबुलेस शेख – जळगाव जिल्ह्याचे “ऑक्सिजन मॅन”
पाचोरा प्रतिनिधी :-
हिन्दुस्थान गॅस एजन्सी संचालक "ऑक्सिजन मॅन" कोरोना काळात संपूर्ण जग थांबले होते. रुग्णालयांत बेड नव्हते, ऑक्सिजनची कमतरता होती आणि अनेक कुटुंबे असहाय्य बनली होती. अशा गंभीर परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील हाजी अबुलेस शेख यांनी जीव धोक्यात घालून अनेक रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवून त्यांच्या जीवाची लढाई जिंकून दिली. त्यांचा हा उपक्रम इतका मोठा ठरला की त्यांना लोक “जळगाव जिल्ह्याचे ऑक्सिजन मॅन” म्हणून ओळखू लागले.
हाजी अबुलेस शेख हे नेहमीच समाजहितासाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. कोरोनाकाळात त्यांनी ऑक्सिजनच नव्हे तर औषधे, अन्नधान्य, रुग्णवाहिका व्यवस्था, अगदी रुग्णालयातील बेड मिळवून देण्यापर्यंत सर्व प्रकारे हातभार लावला. त्यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला.
त्यांचे कार्य केवळ आपत्तीपुरते मर्यादित नाही. ते सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील सक्रिय आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरीब व गरजू कुटुंबांना मदत, तसेच समाजात ऐक्य व बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.
स्थानिक रहिवासी सांगतात की, “हाजी अबुलेस शेख यांच्यासारखे निस्वार्थ सेवाभावी व्यक्तिमत्त्व समाजात वेगळेच दिसून येते. त्यांनी केलेले कार्य विसरण्यासारखे नाही.”
आजही ते समाजातील लहानसहान अडचणींना स्वतःच्या परीने मदत करून सोडवतात. म्हणूनच जळगाव जिल्ह्यात त्यांना “लोकसेवेचे खरे हिरो” मानले जात आहेत

0 Comments