*आ.किशोर आप्पा पाटील यांचा आज निर्धार मेळावा*
“माझ्या वाढदिवसानिमित्त दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ शनिवार रोजी शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी व हितचिंतकांच्या वतीने ‘निर्धार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे हा वाढदिवस फक्त साजरा करण्यापुरता न राहता, तो एक आगळावेगळा निर्धार मेळावा ठरणार आहे. वाजतगाजत, जल्लोषात, भगवा रुमाल गळ्यात टाकून सर्व शिवसैनिकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे. आपल्या साक्षीने विजयाचा निर्धार करण्यासाठी मी आपली वाट पाहत आहे,” असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना कार्यालयात दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, गणेश परदेशी, राजेंद्र पाटील (भडगाव), किशोर बारवकर, प्रवीण ब्राह्मणे, राजेश पाटील आदी उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, “शनिवारी सायंकाळी पाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ‘निर्धार मेळावा’ होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करणारा मी राज्यातील पहिला आमदार ठरलो. त्यानंतरचा हा पहिलाच वाढदिवस व मेळावा आहे. या मेळाव्यात सर्वांच्या साक्षीने स्वबळाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून आगामी निवडणुकीची रणनीती आणि विकासाचे व्हिजन स्पष्ट करण्यात येणार आहे. शंभर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांवर शंभर टक्के विजय मिळवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.” यावेळी गणेश पाटील यांनी आभार मानले.
जय्यत तयारी सुरू
दरम्यान, मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून, या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुण्यांमध्ये आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील, उपनेते सुनील चौधरी, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, डॉ. प्रियंका पाटील (युवती सेना), विष्णू भंगाळे, भय्यासाहेब पाटील (संपर्कप्रमुख), सरिता माळी (उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख), गणेश पाटील (बाजार समितीचे सभापती), पी. ए. पाटील (उपसभापती), विकास पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य), राजेंद्र पाटील (माजी नगराध्यक्ष), जितेंद्र जैन (युवा सेना जिल्हा प्रमुख), सुनील पाटील (शेतकरी सेना), प्रवीण ब्राह्मणे (भीमशक्ती शिवशक्ती), लखीचंद पाटील (युवा सेना), ललिता पाटील (महिला आघाडी), नरेश पाटील (एस.टी. कामगार सेना), धर्मा बाविस्कर (एकलव्य सेना), आत्माराम राठोड (बंजारा सेना) यांच्यासह विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

0 Comments