*आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्न सोडविण्यासाठी महसुल मंत्री बावनकुळे सो. कडे* 



- भाजपा अनु जमाती मोर्चा  जळगाव जिल्हाध्यक्ष हरीलाल कोळी यांची मागणी

*मनोहर कोळी - रावेर प्रतिनिधी*

संपूर्ण महाराष्ट्रभरातुन नागपुर  हिवाळी अधिवेशनावर अनायग्रस्त आदिवासी ढोर कोळी, मल्हार कोळी , महादेव कोळी , टोकरे कोळी जमातीचा जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न कायमचा व सरसकट मिळविण्या संदर्भात ।जमातीचे नेते श्री दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वात दि. १० /१२ / २५ रोजी विधानभवनावर समस्त अन्यायग्रस्त कोळी जमातीचा भव्य मोर्चा काढण्यात आला.

    मोर्चा अनुषगाने आंदोलनात सहभागी होऊन आदिवासी कोळी समाज जळगाव जिल्हाच्या तसेच पक्षाच्या वतीने अनु. जमाती जिल्हाध्यक्ष हरीलाल भाऊ कोळी  यांनी जलसंपदा मत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याशी सल्ला मसलत करून त्यांच्या सुचने नुसार विधानसभेचे कार्यसम्राट आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने तसेच मध्यस्तीने महसुल मंत्री मा ना चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे निवदेन दिले. त्यावर मा. आ. अमोल भाऊ जावळे यांनी संपूर्ण आदिवासी  कोळी समाजावर होत असलेल्या अन्याय बाबत सविस्तर माहिती देवून त्यांनी सकारात्मक सहमती दर्शवून तत्काळ राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना माहिती मागवून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सकारात्मक सहमती दर्शविली. त्यावेळी जळगाव चे कार्यसम्राट आमदार राजुमामा भोळे यांनी आंदोलनाला भेट देण्याची सहमती दर्शवली व समस्त कोळी बांधवांच्या भावना व निवेदन स्विकारण्यासाठी पुढाकार घेतला.हा आंदोलनाला लवकर यश येईल असे भाकीत त्यांच्या चर्चवरून वाटु लागले आहेत . मा आ . अमोल भाऊ जावळे यांनी मी आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्न सुटावा म्हणून पुर्ण पाठपुरावा करेल असे त्यांनी आश्वासित केले त्यावेळी त्यांच्या सोबत सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी संतोष अप्पा सपकाळे , आदिवासी कोळी महासंघाचे जिल्हासचिव मनोहर कोळी , तालुकाध्यक्ष योगेश्वर कोळी , दत्तात्रय उन्हाळे गुरुजी , सागर खवले , आ. अमोल भाऊ यांचे स्वीय सहाय्यक चेतन चौधरी, श्रीकांत भाऊ यांनी चर्चत सहभाग नोंदविला.