अमळनेरच्या विविध क्षेत्रांतील 'रत्नांचा' होणार गौरव; पत्रकार दिनी 'या' मान्यवरांना पुरस्कार प्रदान होणार



.



अमळनेर :-  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई), शाखा अमळनेरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या कार्यकर्तृत्वाने जिल्ह्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आगामी ६ जानेवारी रोजी 'पत्रकार दिन' निमित्त आयोजित भव्य सांस्कृतिक सोहळ्यात या मान्यवरांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.

प्रमुख पुरस्कारार्थी आणि विभाग.


अमळनेर भूषण: माजी मंत्री  आमदार अनिल भाईदास पाटील आणि  ओमप्रकाश मुंदडा यांना या सर्वोच्च मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. शिक्षण व साहित्य, विजय नवल पाटील व मा. भिकन पाटील यांना 'शिक्षण महर्षी', तर मा. शिवाजीराव पाटील यांना 'साहित्य रत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. आरोग्य सेवा: जनसेवेसाठी  डॉ. जी. एम. पाटील (आरोग्य देवदूत) आणि मा. डॉ. प्रशांत शिंदे (आदर्श आरोग्य सेवा दूत) यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक व धर्मदाय कार्य: मंगळग्रह मंदिर देवस्थानला 'आदर्श देवस्थान' म्हणून गौरवण्यात येईल. तसेच  सौ. रिता बाविस्कर,  किरण (कृष्णा) बहारे, मा. प्रविण पाटील आणि ज्ञानेश्वर धनगर यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार दिले जातील.उद्योग व व्यवसाय:  कैलास पाटील (उद्योगरत्न),  प्रीतेश पारख, जितेंद्र गुंजाळ,  रोनक संकलेचा आणि  प्रेमकुमार शासनाणी यांना युवा उद्योजक म्हणून गौरवण्यात येईल. तसेच  पारस गोल्ड यांना 'आदर्श सुवर्णकार' पुरस्कार प्रदान होईल.आदर्श सरपंच नितीन पाटील.विक्की जाधव ,डिगांबर वाघ,महेश पाटील,अनिता सुरडकर,


प्रशासन व पत्रकारिता पत्रकारितेतील प्रदीर्घ सेवेबद्दल नानासो पांडुरंग पाटील यांना 'जीवन गौरव' तर वृत्तपत्र वितरणासाठी मा. एकनाथ सोनवणे यांचा सन्मान होईल. सिद्धांत सिसोदे (पोलीस), अजय शिवरामे (कर्मचारी) आणि वाहतूक पोलीस विभागाला उत्कृष्ट सेवेसाठी सन्मानित केले जाईल.

कला व तांत्रिक:  गोविंद गायकवाड (गायक),  रवींद्र भोई (कलाकार)  यांचीही पुरस्कारासाठी निवड देण्यात येत आहे.


या कार्यक्रमातून समाजातील विविध घटकांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अमळनेर तालुकाध्यक्ष डॉ.समाधान मैराळे यांनी सोमवारी जाहिर केले. दरम्यान निवडीबद्दल पुरस्कारार्थींवर सर्वत्र कौतुक होत आहे.