कुरंगी बांबरुड जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार किरण पाटील
कुरंगी-बांबरुड गटासाठी जिल्हा परिषद,निवडणूक इच्छूक उमेदवार म्हणून आता एक नविन चेहरा समोर येत आहे, पाचोरा तालुक्यातील हडसन येथील रहिवासी,श्रीराम बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्स चे संचालक किरण प्रताप पाटील हे कुरंगी बांबरुड गटात जिल्हा परिषद निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक उमेदवार म्हणून सज्ज आहेत,किरण पाटील यांनी सीआयएसएफ मध्ये राहुन 14 वर्ष देशसेवा केली आहे, देशसेवेतुन स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी बिल्डींग मटेरियलचा व्यवसाय सुरू केला त्याचबरोबर समाजकार्य करण्याची देखील त्यांना आवड निर्माण झाली,रात्री अपरात्री नागरीकांचा मदतीस जाणे, ज्यांना जी मदत पाहिजे ती मदत करणे, दवाखान्यात उपचारासाठी शक्य होईल तेवढी आर्थिक मदत देखील ते करत असतात, सर्व सामान्य नागरीकांना काही समस्या आल्यास वेळ न बघता धावुन येतात,किरण पाटील हे,शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांचे खंदे समर्थक आहेत, आगामी जिल्हा परिषद निवडणूक कुरंगी बांबरुड गटात,आमदार किशोरआप्पा पाटील यांनी,इच्छूक उमेदवार किरण पाटील यांना शिवसेनेचे तिकीट देवून निवडणूक लढण्याची संधी द्यावी, आशा चर्चा कुरंगी बांबरुड गटात ग्रामस्थांकडून सुरू आहे.
इच्छूक उमेदवार किरण पाटील यांच्याशी स्वराज्य न्युजने संवाद साधला असता त्यांनी सांगितले कि, कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा साहेबांनी मला जर शिवसेनेकडून जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची संधी दिली तर,मी त्या संधीचे सोनं करेल,जसे आमदार किशोरआप्पा पाटील, विकास कामे करतात,त्याच प्रमाणे मी देखील,कुरंगी बांबरुड गटाचा विकास करेल अशी माहिती शिवसैनिक किरण पाटील यांनी दिली.

0 Comments