*आबासाहेब सूर्यवंशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित*





पाचोरा प्रतिनिधी - 

६ जानेवारी पत्रकार दिना निमित्त भडगाव तालुका 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने तालुक्यातील तांदुळवाडी येथील माध्यमिक विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात पाचोरा येथील निर्भीड, निष्पक्ष, सडेतोड लेखणीतून सामाजिक, राजकीय, प्रशासकीय स्तरांवर  न्याय हक्कासाठी लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ पत्रकार, दैनिक प्रहार वृत्तपत्राचे पाचोरा  तालुका प्रतिनिधी आबासाहेब लक्ष्मण  सूर्यवंशी  यांना संघटनेच्या वतीने जीवनगौरव  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सदरचा पुरस्कार पाचोरा नगरीच्या लोकप्रीय लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुनीताताई किशोर पाटील आणि भडगाव नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेखाताई मालचे  यांच्या हस्ते , उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरभाऊ रायसाकडा ,जेष्ठ पदाधिकारी राकेश सुतार, गौतम सोनवणे, भोला पाटील, अन्वर शेख, आणि आयोजक भडगाव तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी 

तसेच या कार्यक्रमात  चाळीसगाव नगरीचे ज्येष्ठ पत्रकार दैनिक प्रहार चे तालुका प्रतिनिधी सूर्यकांतजी  कदम यांना चाळीसगाव पत्रकार रत्न आणि पाचोरा तालुक्यातील वरखेडी, पिंपळगाव, लोहारा परिसराचे  वार्ताहर अशोक भाऊ चौधरी यांना समाजरत्न म्हणून तर युवा पत्रकार म्हणून भोला पाटील यांचा सन्मान आणि गौरव करण्यात आला. 

-----------------------

 *विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप*

 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सन्मानित सोहळ्याच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पाचोरा, भडगाव  तालुक्यातील विविध दैनिकात कार्यरत जेष्ठ पत्रकार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या नंतर  विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप वाटप करण्यात आले.  लोकनियुक्त ताईसो. सुनिता ताई पाटील नगराध्यक्ष पाचोरा व प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त ताईसो. रेखाताई मालचे नगराध्यक्ष भडगाव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख अतिथी किशोरभाऊ रायसाकडा (राज्य प्रदेश ) उपाध्यक्ष  .राकेश सुतार, (विभागीय उपाध्यक्ष ), तालुका अध्यक्ष रतिलाल पाटील , पत्रकार हल्लाकृती समिती प्रल्हाद  पवार , जिल्हा उपाध्यक्ष मनीष सोनवणे यांच्या हस्ते कै.यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी येथील आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप करण्यात आले.या प्रसंगी  सरपंच दादाभाऊ वेडू पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, समाजसेवक अमोल जाधव, विकास सोसायटी चेअरमन भाऊसाहेब पाटील, मा. सरपंच सूर्यकांत पाटील, मा.स. सिताराम पवार, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच माध्यमिक विद्यालयातील चेअरमन रवींद्र निकम , मुख्याध्यापक  स्वप्निल निकम यांनी भडगाव व पाचोरा   पत्रकार अशोक  परदेशी, गौतम सोनवणे, चेतन पवार, गोपाल भुई, सलाउद्दीन शेख, भास्कर पाटील, सतीश पाटील, आनंदा पाटील, नाना पाटील, ऋषिकेश अमृतकर, सूर्यकांत कदम, अशोक चौधरी या मान्यवर पत्रकारांचा सत्कार करून गौरवण्यात आले. भडगाव चे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला शोभा आली. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश देऊन गेले.  पत्रकार बांधवांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. कै. यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालयाचे संचालक रवींद्रजी निकम  यांचा सत्कार करण्यात आला.

  मार्गदर्शन रतिलाल पाटील, सूत्रसंचालन हितेश पाटील तर  प्रल्हाद पवार यांनी आभार मानले.