*कोपरगाव तालुक्यातील उकडगाव येथील रेणुका मातेच्या मंदिरात चोरी. 25 ते 30 हजार रुपयांची रोकड लंपास*
कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677
संपूर्ण माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील उकडगाव येथील रेणुका मातेचे मंदिरात अज्ञात चोरट्यांनी रात्रीचे वेळेस दानपेटी फोडून 25 ते 30 हजार रुपये रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली असून तेथील गावकऱ्यांमध्ये संतापची लाट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी जाऊन मंदिर व त्या बाजूचा परिसराची पाहणी केली. व तसेच अज्ञात चोरट्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे दरम्यान पूर्ण चौकशी करण्यासाठी सध्या मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाने मंदिर राची सुरक्षा वाढवण्यासाठी ग्रामस्थांकडून पोलीस स्टेशनला सांगण्यात आले आहे. व लवकरात लवकर अज्ञात चोरट्यांना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

0 Comments