*जागतिक महिला दिनानिमित्त डोंगरगाव येथे कर्तुत्ववान महीलांना रणरागणी पुरस्कार*
पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व पत्रकार संघ गजानन लाधे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१०-३-२०२६ मंगळवारी सायंकाळी ठीक ७ वा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण विश्वामध्ये महिलांना सन्मान दिला जातो. यामुळे महिलांमधील आत्मविश्वास वाढावा व त्यांच्या मनातील भाय भिती कमी व्हावी पुरुषांच्या बरोबरीला महिलांचे कर्तृत्व महान आहे.असं सांगणारा हा जागतिक महिला दिन आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा मॅडम या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या श्वेता सीमा विनोद पाटील होत्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास १८ महिलांना रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व पत्रकार बंधू श्री स्वामी समर्थ सेवेकरी व डोंगरगाव मधील ग्रामस्थ व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महीलांनी घाबरून न जाता अन्याय विरुद्ध लढा देणे हे प्रत्येक महिलेचा कर्तव्य आहे असा संदेश API कल्याणी वर्मा यांनी दिला तर स्त्री पुरुषसमान आहे मुलींनी शिकावं व आपल्या पायावरती उभे राहावं असा संदेश श्वेता सीमा विनोद पाटील यांनी दिलाय तर महीलांना सक्षम व आत्मनिर्भर बनायचं असेल तर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात प्रशिक्षण दिले जाते. अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली यांनी संस्कृती जतन केलं जिजामाता व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा.अशी माहिती ह.भ.प महीला महाराजांनी दिली या कार्यक्रमासाठी डोंगरगाव येथील माजी सरपंच गजानन भाऊ कळवत्रे तसेच मुकेश मापारे व गावातील सेवेकरी माता-भगिनींनी ग्रामस्थांनी अतिशय मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडे वडगाव येथील संदीप पाटील यांनी केले अतिशय भरगच्च व अतिशय शांततेत कार्यक्रम संपन्न झाला राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व कार्यक्रमानंतर स्नेनभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती

0 Comments