पाचोरा बस स्टँडवर चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला उलगडा; दोघे भामटे अटकेत
(प्रतिनिधी= गजानन पाटील) – पाचोरा बस स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मार्च २०२६ रोजी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुमारे ५० हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांची माहिती मिळवून सापळा रचला. त्यानंतर आरोपी अंकुश देवचंद बोरसे (वय १९) व त्याच्या साथीदारास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी पाचोरा बस स्थानक परिसरात चोरी केल्याची कबुली दिली.
दोन्ही आरोपींवर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असून त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश होते. तरीही ते पाचोरा परिसरात येऊन चोरी करत असल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे

0 Comments