पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषणाचा तिसरा दिवस
पाचोरा (प्रतिनिधी) - तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी या जिल्हा परिषद च्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले असून आज तिसरा दिवस आहे. कॉंग्रेस ने पाठींबा दिला आहे
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर ते जुना जरंडी रस्त्याची परीस्थितीत अत्यंत खराब असून या रस्त्याच्या मागणीसाठी गेल्या पंधरा वर्षापासून शेतकरी आपल्या पातळीवर लढा देत आहे मात्र शासनाने सदरच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे आधी हा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक टाकला गेला तर त्यानंतर सदर रस्त्याला जिल्हा ग्रामीणमध्ये वर्ग केला तरी देखील संबंधित परिसरातील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर राज्य महामंडळ क्रमांकाची नोंद तशीच राहिली त्यातच हा रस्ता अद्यापही झाला नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला या उपोषणाला कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाठिंबा जाहीर केला असून उपोषण तात्काळ थांबवावे अन्यथा कॉग्रेस ने आंदोलनाला पाठिंबा साठी तालुका पातळीवर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

0 Comments