वसंत साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी धरणे



कासोदा = येथील गेल्या 30 वर्षापासून बंद असलेला वसंत साखर कारखाना सहकार तत्वावर पुन्हा सुरू करावा त्याची विक्री करू नये तसेच राज्यातील इतर साखर कारखान्यांना जशी थक हमीतून मदत देण्यात आली. तशीच मदत वसंत साखर कारखान्यास द्यावी या मागण्यांसाठी वसाका पुनरुज्जीवन समितीतर्फे 12 तारखेपासून कारखाना परिसरात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

पाचोरा येथील निळकंठ पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली वसंत साखर कारखाना प्रेमींनी कारखान्याच्या जागेवरील दत्त मंदिराच्या आवारात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळात वेळ धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

या आंदोलनात त निळकंठ पाटील सर, ईश्वर पाटील, मधुकर पाटील, उमेश पाटील, सुरेश पाटील, रमेश पाटील, छगन पाटील, आधार पाटील, पी.डी रवंदळे यांच्यासह अनेक वसंत साखर कारखाना प्रेमी सहभागी झाले आहेत