किशोर आप्पा वाटू का साखर...?




पाचोऱ्याचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी गेल्या पंधरवड्यात दोनदा मंत्री पदाविषयी भाष्य केले. 'मी मंत्री होणार' असे भाष्य त्यांनी थेट केले नाही. मात्र मंत्रिपद मिळणार नाही.असेही म्हटलेलं नाही.मात्र माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचे आभार मानतो.कारण मी त्यांच्याच तोंडून ऐकतोय... मंत्री होणार, पालकमंत्री होणार......

निश्चितच मलाही आनंद होतो...... त्याच्या तोंडात साखर पडो.. असे सूचक वक्तव्य आमदार किशोर आप्पा यांनी केले.

आणि जळगाव पाचोरा मधील किशोरआप्पा सोबत कधीकाळी पोलिस कर्मचारी असणारे सवंगडी प्रचंड आनंदला... पोलिसदादा व्हिडिओ पाहुन झाल्यानंतर लगेचच तो शेजारीच बसलेल्या सहकाऱ्याला विचारत गेला.. आप्पांना फोन लावू का ?...ते विचारतो..हे ऐकल्यावर सहकारी पोलिसानेही क्षणात उत्तर दिलं... आधी आपण ऊसाचा रस घेऊ...विषयच थांबला ना.....


*संकलन* 

👇👇

*(किशोर रायसाकडा)*