मजिप्रा राज्यस्तरीय कंत्राटदार संघटनेच्या सचिवपदी पाचोऱ्याचे संजय  कुमावत यांची निवड



मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या राज्यस्तरीय कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल मुंबई येथे पार पडली. या बैठकीत संघटनेची नविन कार्यकारिणी निवडण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष म्हणून राजीव कृष्णानी (पुणे) आणि सचिव म्हणून पाचोरा येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे संचालक संजय कुमावत यांची निवड करण्यात


आली. संघटनेचे इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे- उपाध्यक्ष आर.ए. घुले (पालघर), आर. के. मदानी (मुंबई), खजिनदार-रानडे (पुणे).


या बैठकीला महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील विविध कंत्राटदार उपस्थीत होते.


पाचो-यासारख्या लहान तालुक्यातून एवढ्या मोठ्या संघटनेवर सचिवपदी


संजय कुमावत यांची निवड झाल्याने जळगांव जिल्ह्याचा सन्मान झाला आहे. संजय कुमावत हे अत्यंत अभ्यासु व दांडगा जनसंपर्क असलेले व्यक्तीमत्व आहे त्यामुळे संघटनेला त्यांच्या अनुभवाचा निश्चीतच फायदा होणार आहे. वरील नियुक्तीबद्दल संजय कुमावत यांचे मित्र  परिवाराच्या वतीने अभिनंदन !