आदिवासी कोळी समाजची प्रियंका सपकाळे प्रथमवर्ग न्यायाधीश पदि विराजमान 



(रावेर= विनोद कोळी) आदिवासी कोळी समाज साठी अभिमानाची बाब  प्रियंका अशोक सपकाळे ,अशोक आनंदा सपकाळे मस्कावदकर  यांची मुलगी प्रियंका अशोक सपकाळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राजपत्रित अधिकारी वर्ग एक परीक्षेत उत्तीर्ण होऊन 

मान मिळवला आहे


महाराष्ट्र भरातून केवळ ४०

जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती, त्या परीक्षेत अॅड. प्रियंका यांनी न्यायाधीश होण्याचा मान मिळवला. त्या मुळगांव मस्कावद. ता. रावेर. जि. जळगाव. येथील माजी लेखापरीक्षक कै. अशोक आनंदा सपकाळे यांच्या कन्या आहेत, तसेच वसतिगृह निरीक्षक श्री. धनंजय सपकाळे व मस्कावद येथील उपसरपंच तुषार सपकाळे यांच्या भगिनी आहेत. त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीने त्यांचे रावेर तालुक्यासह संपूर्ण जळगांव जिल्ह्यातून कौतुक केले जात असून तसेच आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था रावेर त्यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.