पाचोरा परिसरात घरात, दुकानात पावसाचे पाणी
आमदार पाटील, नगराध्यक्ष सह प्रशासनाची पहानी
पाचोरा, प्रतिनिधी : शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनता वसाहत, वाल्मिकी नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचून अनेक घरे व दुकाने जलमय झाली. पाणी घरात व दुकानांमध्ये शिरल्याने घरगुती साहित्य, किराणा माल, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने व पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. अनेक कुटुंबांना घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही दुकानदारांना व्यवसायही बंद ठेवावा लागला.
वरील माहिती मिळताच आमदार किशोर आप्पा पाटील, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे,न.पा. मुख्याधिकारी मंगेश देवरे,पाचोरा नगराध्यक्ष सुनिता ताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर,नगरसेविका वर्षाताई ब्राह्मणे , यांनी पाहानी केली.यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या.
प्रशासनाकडून पंचनामा करून नुकसानग्रस्तांना योग्य मदत मिळावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

0 Comments