(पाचोरा प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील खडकी अंतुर्ली येथे अवैधपणे वाळू उत्खनन करतांना JCB पकडण्यात आले.


याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील खडकी अंतुर्ली येथे गिरणा नदीपात्रात वाळू उत्खनन करतांना जेसीबी वाळू भरत असतांना आढळून आले.


पथकास पाहताच जेसीबी चालकाने चालकाने जेसीबी पाण्यात पळवण्याचा प्रयत्न केला असता जेसीबी खडकावर आदळल्याने ऑईल लिक झाल्याने जेसीबी बंद पडला, महसूल पथकाने ते बंद पडलेले जेसीबी, हायड्रा लोडर ने उचलुन ट्रकवरती ठेवून जप्त केले.अश्या प्रकारे महसुल विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली.