अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input Subsidy) स्वरुपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय, महसुल व वन विभाग क्र. सीएलएस-2022/प्र.क्र.349/म-3, दि.27.03.2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित करण्यात आले आहेत. दि.01.01.2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत्त अनुज्ञेय करण्यात आली आहे.
अवकाळी ऑक्टोबर, 2024 (मुख्यतः माहे सप्टेंबर व ऑक्टोबर 2024) या कालावधीत अतिवृष्टी/अवकाळी" यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी पाचोरा तालुक्यातील लागवडीलायक क्षेत्रापैकी 51066.78 हे. आर व भडगाव तालुक्यातील लागवडीलायक क्षेत्रापैकी 22100.15 हे. आर एवढे क्षेत्राचे नुकसान झालेले होते.
अवकाळी ऑक्टोबर, 2024 (मुख्यतः माहे सप्टेंबर व ऑक्टोबर 2024) या कालावधीत " अतिवृष्टी/अवकाळी" यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी पाचोरा तालुक्यातील लागवडीलायक क्षेत्रापैकी 51066.78 हे. आर, शेतकरी संख्या 52364, रक्कम रु.69,45,22,000/-(69 कोटी 45 लाख 22 हजार मात्र) व भडगाव तालुक्यातील लागवडीलायक क्षेत्रापैकी 22100.15 हे. आर, शेतकरी संख्या 34369, रक्कम रु.30.05,62,000/-(30 कोटी 05 लाख 62 हजार मात्र) इतके अनुदान मंजुर झालेले आहे. सदर अनुदान DBT पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) लाभार्थ्यां यांचेकडून बँकनिहाय/आधार क्रमांक निहाय यादी बनवण्याचे कामकाज सुरु आहे. तरी याव्दारे सर्व शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्याला विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्यास त्वरीत आपले सरकार केंद्रात जावून E-kyc करावी व सदरची रक्कम आपल्या खात्यात DBT पोर्टलमार्फत प्राप्त होईल. असे प्रशासनातर्फे आवाहान करण्यात येत आहे.

0 Comments