*दगडया नंबर वन*



पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्तीत विविध गुण-अवगुण असतात. आपापल्या परीने प्रत्येक जण एक वेगळा इतिहास घडवून आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करतो. अशीच वेगळेपणाची अनुभूती पाचोरेकर सध्या अनुभवत असून शहरांतील 'दगड्या' नामक भिकारी पाचोरेकरांच्या हृदयाचा ठाव घेऊन लक्षणीय ठरतो आहे.


'दगड्या' हा शब्द प्रयोग करताच पाचोरावासियांसमोर एक आगळीवेगळी प्रतिकृती स


मोर उभी ठाकते. गेल्या ३० वर्षांपासून पाचोरा शहरात 'दगड्या' वास्तव्य करतोय. पाचोरा शहराचा तो जणू काही नागरिकच बनलाय. त्याची प्रतिकृती आणि दैनदिनी साऱ्यांनाच मोहीत आणि आकर्षित करते आहे.


सडपातळ, उंच डोक्यावर गोल टोपी, एका हातात पाण्याचा डबा, गळ्यात बॅग, एका हातात वर्तमानपत्र अथवा कागदांची पुटळी, पायात सॉक्स, बूट अथवा चप्पल असे वर्णन असलेला 'दगड्या' शुद्ध मराठीत संभाषण करतो मधूनच ही इंग्रजी शब्दांचाही वापर करीत असल्याने तो शिक्षित असावा याची साक्ष पटते.


डॉ.आर.पी. संघवी यांच्या दवाखान्याजवळच्या 'मानसिंगका प्याऊ' च्या ओट्यावर झोपणारा 'दगड्या' सकाळी ७ च्या सुमारास उतून तयार होतो बाजूच्या टपरीबर चहा घेतल्यानंतर तो रेल्वेस्थानक आवारात 

 येतो आणि दिवसभर रेल्वे स्टेशन रस्त्यावरील दुकाने आणि व्यापारी संकुलातील दुकानात भीक मागतो. हॉटेलात खायचे मागतो, त्याचे वैशिष्ट्य असे की, जेथे काही मिळत नाही तेथे तो जातच नाही. काही


विशिष्ट ठिकाणीच जाऊन तो उभा राहतो, नमस्कार करतो आणि हात पुढे सरसावतो, स्मित हास्य करतो आणि निघून जातो. नसले तरी 'दगड्या नावाने ती ३० वर्षापासून पाचोरावासियांना सुपरिचित आहे.


शाळेत ये-जा करणारी मुले प्रथम त्याला त्रास देत त्यामुळे तो कागद अथवा दगड त्याच्या दिशेने भिरकावत असे त्यावरून त्याला 'दगड्या' हे नाव पडले. शाळेत जाणाऱ्या मुलांनाही तो कधी तरी थांबवतो त्यांची विचारपूस करतो आणि त्यांना अभ्यासाचा सल्ला देतो. कधी कोणाला उपद्रव नाही की भीती निर्माण करणे नाहीं, त्याची वेळ व शरीरयष्टी आहे तशीच आहे. सायंकाळी बरोबर ७ चे सुमारास आपल्या झोपण्याच्या ठिकाणी परतणे आणि सकाळी ७ वाजता तयार होणे हा त्याचा नित्यक्रम काही हातगाडीवाले तर 'दगड्या'ला पाहून वेळेचा अंदाज घेतात. त्याचा पेहराव कधीच बदललेला दिसत नाही. विशेष म्हणजे प्राथमिक माध्यमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात अथवा स्नेह संमेलनात 'दगड्या'ची भूमिका आतापर्यंत अनेकांनी केली. महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनातही दरवर्षी 'दगड्या'ना फॅन्सी ड्रेस असतोच. अनेक विद्याथ्यर्थ्यांनी त्या संदर्भात बक्षिसेही मिळविली आहेत, असा हा 'दगड्यां' पाचोरेकरांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला असून त्याने मने जिंकली आहेत.(क्रमशः).......