पिंपळगाव पोलीस स्टेशनचे ओरिजनल दबंग अधिकारी प्रकाश काळे यांची ऑनलाईन चक्री वर कारवाई



पिंपळगांव (हरे) पो.स्टे. CCTNS गुरनं ७९/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १२ (अ) प्रमाणे दि.०१/०४/२०२५ रोजी दाखल असुन सदर गुन्हयात फिर्यादी पोहेकॉ/१३४१ अभिजित दिलीप निकम यांनी फिर्याद दिलेली आहे. वरखेडी गावी बाजारपट्टा भागात आरोपी सागर अशोक चौधरी रा. वरखेडी ता. पाचोरा हा अवैध्द रित्या स्वतःच्या फायदयासाठी कॉप्युटरच्या सहाय्याने ऑनलाईन पध्दतीने चक्री नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळवित असलेबाबत मा. सपोनि सो, प्रकाश काळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले पोउपनि सर्जेराव क्षिरसागर तसेच पोकों/२४४४ अमोल पाटील, पोकॉ/६१० नामदेव इंगळे, चापोकॉ/१४१ दिपक आहिरे, पोकों/२२०९ विकास पवार अशांनी वरखेडी गावी जावून खात्री करुन आरोपी सागर अशोक चौधरी याचेवर छापा टाकुन त्याचे ताब्यात एकुण २७,१००/- रुपयांचा माल त्यात सॅमसग कंपनीची LED, CPU, केबल, अॅडप्टर, किबोर्ड, माउस तसेच १५,००/- रुपये रोख असे मिळून आल्याने ते जप्त करण्यात येवून आरोपी ताब्यात घेतला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकों/२९५२ किरण लक्ष्मण ब्राम्हणे करीत आहेत.