दिपाचोरा पाचोरा पिपल्स बँकेचा लवकरच बिगुल वाजणार

पाचोरा पीपल्सचे ८ हजार मतदार वगळले


पाचोरा-

 दी पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मतदान यादीचा कार्यक्रम निबंधकांकडून जाहीर करण्यात आला आहे. मात्र प्रारूप यादीतून सुमारे ८ हजार मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे उघड झाले आहे.या प्रारूप यादीत सध्या १० हजार ८९७मतदारांची नावे आहेत. मागील निवडणुकीच्यावेळी सुमारे १८ हजार मतदारहोते. दरम्यान प्रारूप यादीवर हरकती घेण्याची मुदत ५ मेपर्यंत असून १५ मे रोजी हरकतींवर सुनावणी होणार आहे. १९ मे रोजी अंतिम मतदार यादीला प्रसिद्धी दिली जाणार असून, त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.

गेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता अशोक संघवी यांच्या नेतृत्वाची या बँकेत सत्ता अबाधित होती.