*भारतीय जनता पार्टीचे नगरदेवळा व पिंपळगाव मंडल अध्यक्ष घोषित*
भडगाव-भारतीय जनता पार्टीचे संघटनपर्व
अंतर्गत नगरदेवळा मंडलाच्या अध्यक्षपदी श्री. गोविंद चंद्रकांत शेलार तर पिंपळगाव मंडलाच्या अध्यक्षपदी सौ. शोभाताई शांतीलाल तेली यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी श्री. धनंजय सुकदेव मांडोळे जिल्हा सरचिटणीस जळगाव पश्चिम, यांनी घोषित केली.
सदर निवड हि पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडली. याप्रसंगी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकिचे सूत्रसंचलन जिल्हा उपाध्यक्ष श्री मधु भाऊ काटे यांनी केले. याप्रसंगी पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व हिंदू बांधवांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संघटनपर्व अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात प्राथमिक सदस्य,सक्रिय सदस्य नोंदणी,बुथसमिती गठन करण्याची प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होती. त्यातीलच मंडल अध्यक्ष निवड हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच पद्धतीने मंडल अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पार पडली.
सर्वसामान्य कुटुंबातील,कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसलेले पक्षाशी प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना अध्यक्षपदी संधी मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सदर निवडीबद्दल महाराष्ट्राचे संकटमोचक मंत्री मा.ना.गिरीषभाऊ महाजन, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, संघटनमंत्री श्री. रविजी अनासपुरे,आमदार श्री.मंगेशदादा चव्हाण, प्रदेश सरचिटणीस श्री.विजयजी चौधरी,जिल्हाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वरजी जळकेकर महाराज, जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.नंदुभाऊ महाजन, डॉ.राधेश्याम चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष श्री.मधुकर काटे,मा. जिल्हा परिषद सदस्य श्री डी एम भाऊसाहेब पाटील, माजी सभापती श्री.सुभाष पाटील,प्रदेश कार्यकारीणी निमंत्रित सदस्य श्री. अमोल नाना पाटील, यांनी नवनियुक्त मंडल अध्यक्षांचे अभिनंदन केले.
सदर बैठकीस प्रमुख उपस्थिती श्री प्रदीप नाना पाटील जि. उपाध्यक्ष, श्री कांतीलाल जी जैन जि. कोषाध्यक्ष, श्री रमेश वाणी जि. अध्यक्ष व्यापारी आघाडी, डॉ. शांतीलाल तेली,जि. उपाध्यक्ष वैद्यकीय आघाडी, श्री हिम्मत सिंग निकम मा. विधानसभा क्षेत्र प्रमुख , श्री नंदू सोमवंशी मा. शहराध्यक्ष, श्री विनोद महाजन, योगेश माळी संजय जेरवाल सर, बापू चौधरी,गणेश पाटील, गोकुळ राठोड, स्वप्निल पाटील, संजू भाऊ पाटील,

0 Comments