*पाचोरा येथील पाटील कुटुंबीयांनी चार धाम यात्रा न करता केले पुस्तकाचे वाटप*
(कुटुंबियांच्या स्तुत्य उपक्रमांचे सर्वत्र कौतुक)
(पाचोरा) चारधाम ची यात्रा करून गंगापूजन
आदी कार्यक्रम करण्याची परंपरा असुन अशा कार्यक्रमातून अनेकदा धार्मिकता व श्रीमंतीचे प्रदर्शन करीत पैशाची उधळपट्टी केल्याचेही दिसून येते, मात्र येथील पाटील परिवारातील अरुण पाटील यांनी पत्नी सोबत चारधाम ची यात्रा न करता पुस्तक तुला करून सुमारे एक लाखाच्या पुस्तकांचे पाचोरा भडगाव तालुक्यातील वाचनालयांना वाटप केले. या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंतुर्ली खुर्द (ता. पाचोरा) येथील प्रगतिशील शेतकरी अरुण पाटील व त्यांची पत्नी सरुबाई पाटील हे धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. गेल्याच वर्षी सरुबाईंनी चार धामची यात्रा पूर्ण केली. आपल्या आईच्या चारधाम यात्रा निमित्ताने आयोजित गंगापूजन कार्यक्रमात वडील अरुण पाटील यांनाही पुण्य लाभावे, या उदात्तहेतुने त्यांचे पुत्र प्राध्यापक वाल्मीक पाटील, व स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार लक्ष्मण पाटील यांनी वडील अरुण पाटील यांची स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या पुस्तकांची पुस्तक तुला केली. त्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे एक लाखाची पुस्तके आणली होती. हे पुस्तके खासदार स्मिता वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील, पाचोरा नगरपालिकेचे प्रशासक मंगेश देवरे, अरुण पाटील, सरुबाई पाटील, आदींच्या हस्ते जागृती वाचनालय ,र.ना देशमुख महाविद्यालयाची अभ्यासिका व सारथी अभ्यासिका (भडगाव) तसेच लक्ष्मीबाई पवार वाचनालय (नगरदेवळा), सावित्रीबाई फुले वाचनालय (कृष्णापुरी पाचोरा), भडगाव पालिका संचलित स्वर्गीय चोरडिया अभ्यासिका, वीर भगतसिंग वाचनालय (अंतुर्ली खुर्द), व पाचोरा महात्मा गांधी वाचनालयाच्या अभ्यासिकेला भेट देण्यात आली , याप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, सुनिता पाटील, पाचोरा बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,सतीष चौधरी, गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, आदी उपस्थित होते. प्रा. सी.एन. चौधरी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले तर आभार प्रा. वाल्मीक पाटील यांनी मानले

0 Comments