जळगाव जिल्ह्यात केळी पॅकिंग साठी

थर्मोकॉल व प्लास्टिकचा वापर


(रावेर विनोद कोळी)

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळी


उत्पादन घेतले जाते .

केळीमध्ये नवनविन तंत्रज्ञान विकसित झाले असून , घडाला प्लॅस्टिकचे आवरण घालण्यात येते आहे .

तसेच केळीचे घड कापुन आणल्या नंतर त्यांना स्वच्छ केल्यावर वाहातुक वाहानामध्ये

लोड करतांना केळीच्या 

आजुबाजुला धक्के लागुनये म्हणून , व प्रवासामध्ये केळीचे नकसान होऊनये यासाठी वाहान आधीच थर्माकॉल च्या बारीक

आवरणाने आच्छादनात येते .

त्यामुळे केळीचे नुकसान होत नाही .

व देशाच्या सर्वाच भागात पाठवली जाते .

मात्र परिणामी हे आवरण लावत असतांना त्याचे अवषेश शेतातच जमिनिवर पडून   असतात .

प्लाटिकच्या व . थर्मोकोलच्या  अतिवापरामुळे ,

जागोजागी यावल सावदा रावेर पासून तर थेट माहाराष्ट्रच्या हद्दी पर्यंत

रस्त्याच्या दुतर्फा भागाला मुख्यात : विवरे , वाघोदा , रावेर , व इतर गावां जवळ उकिडयांवर थरच्या थर

तुकडे विखुलेले असतात .

वारंवार एकाच थर्माकोल व प्लास्टिकचे तुकडे पडुन

राहील्याने जमिनित

पाणी कसे मुरेल हा प्रश्न

आता निर्माण झाला आहे .

कारण प्लास्टिक कचरा हा नष्ट होत नाहीत . किंवा त्याला रिसायकलला पाठवता येत नाही हे कचऱ्यात 

टाकण्यात येत असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे .

रावेर यावल परिसर हा आधिच डार्किझोनमध्ये समाविस्ट करण्यात आला आहे . येथिल भुर्गभातील पाण्याची

पातळी खालावलेली असतांना जमिनिवर हे प्लास्टिक कचरा व थर्मोकॉलचे थर टाकण्यात येत आहेत .

याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होतांना दिसत आहे .

भविष्यातील होणारे वाईट परिणाम थांबण्यासाठी  सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व थर्मोकॉल व प्लास्टिकचा वापर योग्य पद्धतीने करून ,

राहीलेला कचरा गोळा करून , नेस्त नाबुता करावा

अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे .