गर्भवती बायकोला सोडुन संशयिताने अल्पवयीन मेहुणीलाच पळवले
जामनेर, जिल्हा जळगाव येथील तालुक्यातील
एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला असून, गर्भवती पत्नी भेटण्यासाठी सासरी आलेल्या एका जावयाने आपल्या अल्पवयीन मेहुणीला दवाखान्यात नेण्याच्या बाहेर पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीची आई आणि सौ सविताची संशयिताची सासू हिने फत्तेपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीची मोठी मुलगी सध्या गर्भवती असून तिचा पती काही दिवसांपूर्वी सासरी राहण्यासाठी आला होता.
दरम्यान अल्पवयीन मेहुणीला तब्येतीची तक्रार असल्याचे सांगून जावयाने तिला दवाखान्यात घेऊन जातो असे सांगितले.
विश्वासाने त्यांनी मुलीला त्याच्यासोबत पाठवले मात्र सायंकाळपर्यंत दोघे घरी न परतल्याने त्यांच्या अनुपस्थितीची चिंता वाढली.कुटुंबीयांनी आसपासच्या गावांमध्ये शोधाशोध केली,मात्र काहीच माहिती मिळाली नाही.
अखेर मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली.आणि जाव्या विरुद्ध अल्पवयीन मुलीला फसवून पळवून नेल्याची तक्रार दिली.याबाबत गावात सर्वत्र चर्चाला उधाण आले असून पळून गेलेल्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
फत्तेपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असुन, आरोपीच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

0 Comments