*महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पाचोऱ्यातील खुशी पटवारी मेरीट मध्ये*
पाचोरा *जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा पुणे परिक्षेत द वर्ल्ड इंटरनॅशनल स्कुल ची विद्यार्थीनी कु खुशी राजेश पटवारी(आठवी) हीने गुणवत्ता यादीत यश संपादन केले . सदर परिक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातुन जवळपास ३८७००० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती . तिला शासनाकडून शिष्यवृत्ती च्या माध्यमातून दर महिन्याला पुढील शिक्षणासाठी शासकीय मानधन ही मिळणार आहे*.
*तीच्या या यशात देसले क्लासेस पाचोरा चे प्रा सुभाष देसले सर व रवि देसले सर तसेच वर्ल्ड स्कुल चे निखील बिडकर सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले*
*खुशी पटवारी ने यापूर्वी ही वेगवेगळ्या परिक्षेत गोल्ड मेडल व प्रशस्ती पत्र मिळवुन नावलौकीक मिळविले आहे . कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापारी मा . पत्रकार राजेश पटवारी यांची ती ज्येष्ठ कन्या आहे*
*तिच्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरातुन सर्वत्र खुशी वर कौतुकाचा वर्षाव होत आहे*

0 Comments