कुऱ्हाड येथे बंद घरातून भरदिवसा एक लाखाची चोरी



पाचोरा-


पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे बंद घरातून एक लाखाची रोकड चोरी गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

 शेतकरी धनराज चौधरी व त्यांचे कुटुंब दुपारी शेतातून घरी आल्यानंतर घडलेला प्रकार लक्षात आला.

 हे शेतकरी कुटुंब सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांच्या राहत्या घरात ठेवलेल्या रोख रकमेपैकी एक लाख रुपये दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरून नेले.सदर घटनेबाबत धनराज चौधरी यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली असता पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या नुकत्याच बदलून आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव शिरसागर , पोलीस हवालदार नामदेव इंगळे,राहुल बेहरे,अमोल पाटील , ए एस आय अरविंद मोरे,अतुल पवार , शैलेश चव्हाण आदी सहकार्यांनी  घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.या वेळी काही संशयित लोकांना ताब्यात घेत चोरीचा पुढील तपास लोहारा दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहे.