वरसाडे प्र.पा. येथे देशी दारूचा साठा पकडला ३७,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.



पाचोरा प्रतिनिधी :-


सह पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार वरसाडे प्र.पा. गावातील सुभाष गना राठोड हा आपल्या घरी देशी दारूची चोरटी विक्री करीत असल्याची खबर मिळाली.


सदर माहितीच्या आधारे सपोनि वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका तात्याबा नागरे, पोना रविंद्रसिंग पाटील, पोकॉ गोविंद वाळले, पोहेकॉ अरुण राजपूत, पोना राहुल बेहरे, पोकॉ अमोल पाटील, पोकॉ सागर पाटील, मपोशि योगिता चौधरी यांनी दोन पंचांच्या उपस्थितीत वरसाडे प्र.पा. येथे छापा टाकला.


या कारवाईदरम्यान, संशयित सुभाष राठोड याच्या घरातून टॅगो पंच ब्रँडच्या देशी दारूच्या सुमारे ९ खोके (प्रत्येक खोक्यात १०० बाटल्या, प्रत्येकी ९० मि.ली.) व खुल्या ३५ बाटल्या असा एकूण अंदाजे ₹३७,४००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


पोलिसांनी सुभाष राठोड यास मुद्देमालासह ताब्यात घेतले असून, पोकॉ गोविंद वाळले यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गु. र. नं. १८३/२०२५, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका तात्याबा नागरे हे मा. सपोनि कल्याणी वर्मा मॅडम यांच्या आदेशानुसार करीत आहेत.