नगरदेवळा सेंट्रल बँकेकडून महिला बचत गटांसाठी कर्ज मेळावा
नगरदेवळा ता.पाचोरा :
येथील सेंट्रल बँक शाखेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात महिला बचत गटांना सुमारे एक कोटी पस्तीस लाख रुपयांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले.दुपारी एक वाजता ग्रामपंचायत कार्यालयात नगरदेवळा सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक नितीश साळुंखे यांनी याविषयी बहुमोल मार्गदर्शन महिला बचत गटांना केले.कर्जाचे हप्ते, विमा पॉलिसी व नियमित कर्जाची परतफेड कशी करायची याविषयी सविस्तर माहिती दिली. यानंतर बचत गटाचे पाचोरा तालुका व्यवस्थापक सूर्यप्रकाश राऊत यांनीही यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.लखन वाघमारे व राजेश राठोड यांनीही यावेळी मोलाचे मार्गदर्शन उपस्थित महिलांना केले.यावेळी हर्षल सोनवणे,संदीप खेडकर,बँक कृषी अधिकारी सोनाली देसाई,बँक सखी अनिता परदेशी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंजली चव्हाण यांनी केले.यावेळी नगरदेवळा बाळद गणातील सर्व केडर व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments