सुतारी कारागीरच निघाला चोर: पाचोरा पोलिसांनी केले जेरबंद




येथील दिनांक 27जुलै 2025 रोजी दुपारी बारा ते साडे बारा वाजे दरम्यान पाचोरा शहरातील वृंदावन पार्क येथील अश्विनी राजेश डहाळे  राहणार वृंदावन पार्क, पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांच्या घरातुन कोणीतरी, अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचुन लबाडीच्या इराद्याने त्यांचे पर्समध्ये ठेवलेली 1,05,000/-रु किमतीचा सोन्याचा नेकलेस सुमारे 11 ग्रॅम वजनाचा,1500/-रुपये रोख त्यात 500 रुपये दराच्या तिन नोटा.असा 1,06,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेले म्हणून अज्ञात चोरट्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास गजानन देशमुख हे करीत होते.

दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असतांना गुन्ह्यातील संशयित आरोपी  रमेशकुमार शामलाल जांगीड, वय 49 वर्षे, राहणार वार्ड नंबर 3 ईसाडिया तालुका मादपुर जिल्हा सिकर राजस्थान हल्ली मुक्काम एस.बी.आय. कॉलनी, पाचोरा  हा फिर्यादी यांचे घरी फर्निचरचे काम करित असल्याची माहिती मिळाली. तो घटना झाल्यापासुन पसार झाला होता. त्यास गुप्त बातमीदाराच्या माहितीवरुन ताब्यात घेवुन गुन्ह्या संदर्भात विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी साडे सहा ते सात वाजे दरम्यान अटक करण्यात आली आहे त्याने गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल तो रहात असलेल्या एस. बी. आय कॉलनीतील बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी लपवुन ठेवल्या बाबत कबूली दिल्याने त्याचे ताब्यातुन 1,05,000/-रु किमतीचा सोन्याचा नेकलेस सुमारे 11 ग्रॅम वजनाचा  1500/-रुपये रोख त्यात 500 रु. दराच्या तिन नोटा. असा 1,06,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल सदर ठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे. सदरच गुन्हा उघडकिस आलेला असुन अटक केलेल्या आरोपीस माननीय न्यायालयात रिमांड रिपोर्टासह हजर करण्यात येणार आहे.


सदरची कामगिरी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व पाचोरा स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस हवालदार गजानन देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपुत, जितेश पाटील, हरिष परदेशी, कमलेश राजपुत यांच्या पथकाने हि कारवाई पार पाडली आहे.