दहा कोटींच्या बोगस कर्ज प्रकरणी १६ जणांना अटक



भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांची नुतन सहकारी पतपेढीतील गैरव्यवहार प्रकरण


जळगाव : भुसावळ येथील प्राथमिक

शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढीमध्ये सभासदांच्या नावे कर्ज प्रकरणे मंजूर करून नऊ कोटी ९० लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने १६ जणांना अटक केली. यामध्ये आठ संचालक व आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढीमध्ये सन २०१६ ते २०२१ यादरम्यान सभासदांच्या नावे कर्ज मंजूर करण्यात येऊन संचालक व कर्मचाऱ्यांनी नऊ कोटी ९० लाख रुपयांचा अपहार केला होता.                                                                                  लेखापरीक्षणा दरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आला. जिल्हा उपनिबंधकांनी नियुक्त केलेल्या ऑडिटरने या बोगस कर्ज प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून एकूण ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यामध्ये २८ जुलै रोजी १६ जणांना अटक करण्यात आले.                                                                                         अटक केलेल्यांची नावे

गंगाराम सीताराम हेगडे (पिंप्राळा, जळगाव), हरिश्चंद्र काशिनाथ बोंडे (सावदा, ता. रावेर), राजू लालू गायकवाड (भुसावळ), हितेश संजय नेहते (भुसावळ), रमेश चिंधु गाजरे (फैजपूर, ता. यावल), कृष्णा गजमल सटाले (रा. जामनेर), मधुकर श्रीकृष्ण लहासे (पहूर, ता. जामनेर), सुरेश गंगाराम इंगळे (खिरोदा, ता. रावेर), कैलास पंडित तायडे (जळगाव), पंकज मोतीराम ढाके (रा.भुसावळ), संजय तुळशीराम चौधरी (रा. जामनेर), अझरुद्दीन राजेंद्र तडवी (रा. फैजपूर), राहुल लक्ष्मीकांत चौधरी (भुसावळ), जितेंद्र सुधाकर फेगडे (भुसावळ), राजेश देविदास लहासे (भुसावळ), हितेंद्र अमोल वाघुळदे (फैजपूर)