कायद्यासाठी 'काठी' चालवली... आता वाजवताय टाळ
निवृत्त निरीक्षकाने धरली पंढरीची वाट; 'खाकी'च्या सेवेतील अधिकारी बनला वारकरी
रईस शेख : सकाळ वृत्तसेवा
जळगाव : वारकरी झाल्यावरचा पेहराव, 'इन्सेंट'मध्ये कर्तव्यावर असताना पोलिस अधिकारी किश्शन नजन- पाटील.
जळगाव, ता. २४: जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिस दलात राज्यभरातील विविध भागातील अधिकाऱ्यांनी सेवा दिलीय.. अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी किशन नजन पाटील हे त्यापैकी एक.. जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी अनेकांना काठीच्या धाकाने सरळ केले. कायदा राबवताना ठोकूनही काढले.. खाकीत असताना कायद्याचा पायिक असलेला हा अधिकारी आता पंढरीचरणी लिन झालाय.. हाती टाळ ठोकत पायीच पंढरीच्या दिशेने निघालांय...
जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेतून नुकतेच वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील निवृत्त झाले. निवृत्तीनंतर नाशिक जिल्ह्यात
कर्तव्य अन् विठ्ठलाचा साक्षात्कार...
'पोलिस खात्यातून सेवानिवृत्त झालो, तेव्हाच निवांत आयुष्य जगण्याचा प्रण केला आहे. शेती-माती अन् वाचन लिखाणाचा छंद जोपासायचा आहे. नेहमीच वाटायचे एकदातरी वारकऱ्यांप्रमाणे पायी जावून विठ्ठलाचे दर्शन घ्यावे.. तो संकल्प आणि आयुष्याचे स्वप्न आता पूर्ण होत आहे.. आषाडीनिमित्त आम्ही सोमवारी (ता. २३) सकाळी नऊ वाजता बडाळा महादेव (जि. नगर) येथून २०० वारकऱ्यांसह वारी पंढरीच्या दिशेने निघालीय. आहे. दररोज ३० किलोमिटर, १३ ठिकाणांवर मुक्काम अन् २८० किलोमीटर चालून विठ्ठल दरबारी पोहचणार आहोत. अखंड कानी पडणारा माऊलीचा गजर अन् टाळ मृदंगाचे स्वर.. असा वारीचा अनुभव.. शब्दात व्यक्त करणे शक्य नाही' असे नजन- पाटील म्हणाले.
स्थायिक होण्याचा विचार होता.. परंतु, गावची ओढ घराकडे घेऊन आली. नगर जिल्ह्यातील वडाळा महादेव येथे वडिलोपार्जित शेती आणि
निवासस्थानी ते राहातांय... कुटुंबात उच्वशिक्षण घेत असलेला मुलगा-मुलगी, पत्नी असा चौकस परिवार 'बी.एससी. अॅग्री' नंतर पोलिस खात्यात
दाखल स्वतः कलेची आवड, वाचन आणि लिखाणाचे वेड, नवीन प्रयोग करण्याचा छंद अशा या 'हरफनमौला' अधिकाऱ्याने जळगाव जिल्ह्यातही सेवा बजावली.
अडावद, चोपडा, यावल, रावेर, भुसावळ पाचोरा, जळगाव शहर अशा अनेक पोलिस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली. जळगाव वगळता नाशिक परिक्षेत्रात इतरही पोलिस ठाण्यात त्यांच्या बदल्या झाल्यात.. मात्र, ओढ कायम जळगावचीच राहिली. आणि आजही कायम आहे.
'खाकी' जाऊन वारकऱ्याचा पेहराव
पोलिसदलात अंगात खाकी गणवेश, डोक्यावर पी-कॅपचा रुबाब, हातात केन,
कंबरेला पिस्तूल, लाल कंबरपट्टा-बुट, खांद्यावर चकाकते तारे.. अशा गणवेशात सेवा बजावली. खाकीचा रुबाबच न्यारा.. त्याद्वारे अनेकांना वठणीवर आणले.. पोलिसांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात त्यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईबाबत त्यांना न्यायालयीन लढाही लहावा लागला. मात्र, तडजोड काही केली नाहीच नाही. असा हा न बाकरणारा अधिकारी विठ्ठलचरणी लिन होतांना आज दिसून आला. अंगावर पांढरा सदरा-पायजमा, डोक्यावर वारकरी टोपी, गळ्यात टाळ, खांद्यावर शबनम पिशवी अशा अस्सल वारकऱ्याच्या पहेरावात नजन पाटील विठ्ठलाच्या दर्शनाला पायी निघाले आहेत.

0 Comments