पाचोरा शहरात चर्मकार बांधवाना मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्री स्टॉलवर अतिक्रमणाची कार्यवाही करु नये.!!
अन्यथा जन आंदोलन
चर्मकार अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा इशारा.*
*पाचोरा नगरपालिका हद्दीत जागा उपलब्ध करून देण्याची निवेदना व्दारे मागणी!!!*
*पाचोरा* (वार्ताहार) महाराष्ट्रातील चर्मकार समाज बांधवाना १००% अनुदान तत्वावर मिळालेल्या सामाजिक न्याय विभाग संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाव्दारे महाराष्ट्र शासनाकडुन ऊन,वारा,
पाऊस यांच्या पासून सुरक्षीत बचाव म्हणून पत्री स्टॉल देण्यात येते.यामध्ये चर्मकार समाज बांधव हे पारंपारिक असलेला गटाई काम तसेच बूट,चप्पल,
बॅग,रिपेअरिंग,शुज,कुशन काम व आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर
आपल्या परीने व्यवसाय करीत आहे.पाचोरा शहरातील ज्या जागांवर महाराष्ट्र शासनाकडून मिळालेले पत्री स्टॉल ठेवलेले आहेत.त्या परिसरात स्टॅाल धारकांकडून कोणालाही कोणताही प्रकारचा त्रास होत नाही आणि तक्रार देखील येत नाही.तरी देखील पाचोरा नगर पालिका प्रशासन शहरातील पत्री स्टॉल जप्त करून घेत आहेत. यामुळे त्यांच्या स्टॉलची व दुकानातील साहित्यांची नासदुस होत आहे.या सुरु आसलेल्या कार्यवाहीमुळे आज रोजी त्यांच्याकडे दुसरा कुठला व्यवसाय नाही त्याच्यावर व परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे.कुटुंबांचा आणि परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा? हा प्रश्न निर्मिण झाला आहे.काही युवा समाज बांधव शिक्षित आहेत त्यांना नोकरी नाही म्हणून ते आपल्यापरीने व्यवसाय करत आहेत.जे अशिक्षित आहेत त्यांनी बूट,चप्पल,बॅग, रिपेअरिंग, शुज पॉलीश, करत आहेत तर काहींनी संगणकाचा अभ्यास करून शिक्षणा सोबत महाराष्ट्र शासनाव्दारे मिळालेल्या पत्री स्टॉलमध्ये व्यवसाय करीत आहे.तरी मा.मुख्याधिकारी सो. नगरपालिका पाचोरा यांना विनंती करण्यात येते की,भविष्यात कुठली ही अतिक्रमणाची कार्यवाही करून पत्री स्टॉल जप्त करण्यात येऊ नये.तथा सद्याजे स्टॉल ज्या जागेवर स्थित आहेत तेथेच त्यांना स्थीर करण्यात यावे व स्टॉल धारकांना स्टॉल परवाना देण्यात यावा अशी विनंती चर्मकार समाज बांधवाकडून करण्यात आली आहे.
अन्यथा असे न झाल्यास नाइलाजास्तव कायदा सुव्यवस्थेचा मान राखत लोकशाही मार्गाने नगरपालिका पाचोरा येथे निषेध मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येईल व होणारा परीणामास संबंधित प्रशासन जबाबदार राहील.असा इशारा देखिल देण्यात आला आहे.या पध्दतीने आशेचे विनंतीचे निवेदन चर्मकार अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून मा.मुख्याधिकारी सो. नगरपालिका पाचोरा व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील यांना देण्यात आले.
यावेळी पाचोरा शहरातील सर्व गटाई कामगार,
चर्मकार समाज बांधव व चर्मकार अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी व इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments