*खाजगी शाळेच्या बस चालका कडुन अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ*
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलीसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला असून शेंदुर्णी येथील एका खाजगी शाळेच्या बस चालकाविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याफबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की शेंदुर्णी येथील रहिवासी असलेला ४१ वर्षीय अबिद हुसेन शेख हा एका खासगी शाळेच्या बसवर चालक म्हणून कामाला होता. शाळेच्या बसवर चालक म्हणून काम करत असतांना अबिब शेख हा त्याच्या स्कूलबस मधून शाळेत जाणाऱ्या लहान, अल्पवयीन मुला, मुलींशी वाईट हेतूने विद्यार्थीनींकडे वाईट नजरेने पाहणे कारण नसतांना जवळीक साधून मुद्दामहून नको त्या ठिकाणी स्पर्श करणे, तु मला खूप आवडतेस अशी अश्लील स्वरुपाची भाषा वापरुन मुलींवर दबाव टाकणे अशी कृत्ये करत होता.
अशातच अबिद हुसेन शेख याने एकेदिवशी म्हणजे १९ ऑगस्ट २०२५ मंगळवार रोजी सकाळी त्याच्या स्कूलबस मधून शाळेत जा, ये करणाऱ्या एका पिढीत विद्यार्थीनीचा पाठलाग करत वाईट हेतूने हात धरुन छेडछाड केली अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अल्पवयीन विद्यार्थिनी घाबरुन गेली व अबिद हुसेन शेख याच्या भीतीने ती गप्प बसली ही परिस्थिती पाहून संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी अधिक माहिती जाणून घेतली असता स्कूलबसच्या चालकाने आपल्या मुलीशी वाईट हेतूने गैरवर्तणूक केल्याची माहिती समोर आली.
ही माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी थेट पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला धाव घेतली व घडलेला प्रकार सांगून बसचालक अबिद हुसेन शेख याच्या विरोधात तक्रार दाखल करत पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कल्याणी वर्मा क्षणाचाही विलंब न करता आरोपीला अटक केली असून संबंधित चालकाविरुद्ध पोक्सो कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास व कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करत आहेत.
या घटनेमुळे शेंदुर्णी गावासह जामनेर, पाचोरा व सोयगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कठोरात, कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच अशा घटना घडत असतील तर मुलींना शाळा शिकवायची की नाही अशा द्विधा मनस्थितीत पालक पडले असून खाजगी शैक्षणिक संस्थेच्या संचालकांनी आपल्या शाळेत कर्मचारी कामावर घेतांना त्याची चारित्र्य पडताळणी करुनच कामावर घेतले पाहिजे अशी मागणी केली जात आहे.

0 Comments