*रावेर तालुका आदिवासी कोळी जमातीची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न*



 (विनोद कोळी) रावेर आराध्यदैवत आदयकवी *महर्षी वाल्मीकी जयंती नियोजना संदर्भात* दरसाला प्रमाणे तालुकास्तरावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यासंदर्भात  मा. श्री हरलाल भाऊ कोळी यांच्या अध्यक्षतेखाली मिटींग घेण्यात आली त्या दरम्यान यंदाची जयंती मोठ्या उत्साहात व प्रमाणात साजरी करण्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी त्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात यावे. गावा गावात जाऊन तसेच तरुण बांधवांनी स्त्रीयांना , विद्यार्थांना , जेष्ठ , श्रेष्ठ , तसेच सर्व जागृत समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहण्या संदर्भात आवाहन करावे. असे सर्वातुमते ठरले. त्यावेळी खालील उत्सव समिती स्थापन करण्यात आली. हरलाल कोळी अध्यक्ष , भुषण तायडे उपाध्यक्ष , मनोहर कोळी सचिव , योगेश्वर कोळी खजिनदार , प्रमुख सल्लागार - आत्माराम कोळी , चंद्रकांत कोळी , ईश्वर तायडे , सुधाकर कोळी , पंडित कोळी , सदस्य- जयराम कोळी , शिवाभाई उर्फ विनोद कोळी , गोपाल कोळी , किरण कोळी , सचिन महाले , उमेश कोळी , राजु कोळी , किशोर कोळी , अनिल अट्रावलकर , विक्की कोळी , बंडु कोळी , गफ्फुर कोळी , अशोक कोळी , नारायण तायडे , कैलास कोळी त्यावेळी अनेक समाज बाधव हजर होते प्रास्ताविक मनोहर कोळी आभार चंद्रकांत कोळी यांनी मांडले.